काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज : मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
पणजी : गोव्यात आज तापमान 36 डि.से.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागात किंचित पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. दि. 25 मेपर्यंत गोव्यात जोरदार वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. गोव्यात 22 मे रोजी पावसाचा इशारा दिला होता. पण सर्वत्र ढगाळ हवामान राहिले, त्यातच पारा 35.5 डि.से. एवढा वाढत राहिला. यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागले. दि. 23 रोजी म्हणजेच आज मंगळवारी गोव्यात काही भागात मध्यम तथा हलक्या स्वऊपात पाऊस होईल, असे म्हटले आहे. समुद्र सध्या खवळलेला आहे. जोरदार वारे वाहत असून सध्या वाऱ्याचा वेग ताशी 40 कि.मी. एवढा असून तो ताशी 55 कि.मी.पर्यंत जाण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे. दि. 25 मेपर्यंत तापमान वाढत राहाणार आहे. त्याचबरोबर जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. किमान तापमान हे देखील 27 डि.से.च्याही पुढे जात आहे. पणजीत सकाळी 27.6 डि.से. एवढे तापमान होते. गेले काही दिवस राज्यात उकाडा वाढत आहे आणि आजपासून तापमान वाढण्याचीही शक्यता आहे. आज गोव्यात पारा 36 डि.से. एवढा राहील. पावसाचा इशारा हवामान खाते वारंवार देत आहे आणि पाऊस मात्र गोव्याला वाकुल्या दाखवित शेजारील राज्यामध्ये जाऊन पडत आहे. यंदा गेल्या पाच महिन्यात एक दोन वेळा तुरळक पाऊस झाला. पणजीत पाऊस पडला तर स्मार्ट सिटीवाल्यांना पणजीतील एकंदरित समस्यांचा अंदाज येईल. परंतु, वारंवार लपाछपीचा खेळ करणारा पाऊस आभाळात काळ्dया ढगांमधून दिसतो परंतु तो प्रत्यक्षात पडत नाही.









