वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल संघाचे क्रोएशियन फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या करारामध्ये वाढ करण्यात आली असल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने केली आहे. फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्याबरोबर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने यापूर्वी केलेल्या करारामध्ये दोन वर्षांची वाढ केली आहे. आता स्टिमॅक 2026 सालापर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहतील. त्यांच्या प्रशिक्षकाच्या मुदतीत भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी निश्चितच समाधानकारक झाली आहे. भारतीय फुटबॉल संघाने 2023 च्या फुटबॉल हंगामात तीन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. आय लिग फुटबॉल स्पर्धेला 28 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असल्याचे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.









