रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा रेपोदरात वाढ ?
मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीकडून पुढील द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत पुन्हा रेपो दरात वाढ केली जाऊ शकते, असे मत एमके ग्लोबल फायनॅन्शीयल सर्व्हिसेस यांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँक सदरच्या पुढील बैठकीत रेपो दरात 25 बेसीस पॉइंटची वाढ करु शकते, असे संस्थेने म्हटले आहे. जागतिक अस्थिरतेमुळे रिझर्व्ह बँकेला रेपोरेट वाढवावा लागणार आहे. 25 बेसीस पॉइंट वाढीसह रेपोरेट 6.50 टक्के इतका करण्यात येऊ शकतो, असेही संस्थेने सांगितले आहे.









