कोल्हापूर :
कळंबा गावासह परिसरात असणाऱ्या उपनागरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिवबानाना जाधव पार्क येथे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर लाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य झाले आहे. याचाच फायदा चोर घेत आहेत. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे किरकोळ स्वरूपाची चोरी झाली आहे. त्यासाठी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागू नये, चौकशीची डोकेदुखी कशाला अशा मानसिक्तेमुळे पोलीसांकडे नागरीक तक्रार करत नाही. तक्रार नसल्याने पोलिस कारवाई करत नाहीत, याचा फायदाही अप्रत्यक्षरित्या भुरटया चोरांना होत आहे.
एकीकडे शहरीकरण वाढत आहे. परंतू तेथील समस्याही वाढतच चालेल्या आहेत. प्रारंभी किरकोळ स्वरूपाचे येथे गुन्हे घडत होते. आता येथे चोरीसह अन्य गुह्यांचे प्रमाणही वाढत आहे. कळंबा व उपनगर परिसरातही हे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी उपनगरातील जिवबानाना जाधव पार्क येथे मध्यरात्री सुमारास रस्त्यावर लाईट नसल्याचा फायदा घेत येथील परिसरात सुरू असणाऱ्या बांधकांमावरील सहा सेन्ट्रीनग प्लेट, आज्ञातानी चोरी केली. यापैकी दोन प्लेट शेजारी असणाऱ्या शेतवडी मध्ये नागरिकांना दिसून आल्या आहेत. तसेच परिसरातील चारचाकी टेम्पोतील बॅटरी, चोरट्यांनी लंपास केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून अशा प्रकारच्या गुह्यामध्ये कळंबा व उपनगरात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
कळंब्यासह उपनगरात घराजवळील रस्त्यावर किंवा दुकांनाच्या बाहेर लावलेल्या दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. तसेच मध्यरात्री सेन्ट्रीनग प्लेट, लोखंडी रॉड, टेम्पोतील बॅटरी यांसारखे भुरट्या चोरीचे प्रमाण कळंबा परिसरात वाढले आहेत. कळंबा गावची व उपनागरतील वाढती लोकसंख्या पाहता या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवण्याची गरजेचे आहे. तसेच कळंबा मेन रोड व उपनागरतील सी. सी. टीव्ही बंद अवस्थेत आहेत. जर सीसीटीव्ही सुरू असते तर झालेल्या चोरीचा छडा लागणे पोलिसांना सोपे झाले असते. घरफोडी चोरांच्या गुन्हेपद्धती, वाहन चोरांच्या टोळ्या तसेच, चोरीच्या वाहनांची लावण्यात येणारी विल्हेवाट याबाबत पुरेशी माहिती नसल्याने चोरीला गेलेली गाडी सापडणे कठीण ठरते.
परिसरात गस्तीची गरज
घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी टेम्पोतील बॅटरी चोरी झाली आहे. तसेच हा प्रकार गेल्या आठ दिवसंपासून सुरू आहे परिसरातील सुरू असणाऱ्या बांधकांवरील लोखंडी रॉड शिवाय सेन्ट्रीनग प्लेट ही चोरीला गेल्या आहेत. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्याची गरज आहे.
सुजय भोसले नागरिक








