नितीशकुमार सरकारची मोठी घोषणा
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत, सर्व वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना आता दरमहा 400 रुपयांऐवजी 1,100 रुपये पेन्शन मिळेल. जुलै महिन्यापासून सर्व लाभार्थ्यांना वाढीव दराने पेन्शन मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून केली आहे. या योजनांची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. या निर्णयाचा लाभ 1 कोटी 9 लाख 69 हजार 255 लाभार्थ्यांना होईल, असेही नितीशकुमार म्हणाले.









