संसर्ग वाढण्याच्या भीतीने खबरदारीच्या उपाययोजना
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गुऊवारी पाचवा ऊग्ण आढळून आल्यानंतर ऊग्णांच्या संपर्कात आलेल्या 700 लोकांपैकी 77 जणांना उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या 700 लोकांच्या आरोग्यावर सरकार लक्ष ठेवून आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात आली आहे. केरळमध्ये आतापर्यंत दोन ऊग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. हाय रिस्क झोनमधील ऊग्णांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. याशिवाय सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनवरही सरकारकडून जनजागृतीचे संदेश प्रसारित केले जात आहेत, असेही जॉर्ज यांनी स्पष्ट केले.
कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन ऊग्णांचा मृत्यू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीने वापरलेला मार्ग कंटेनमेंट झोनमध्ये बदलला आहे. तर 9 पंचायतींमध्ये कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली असून कंटेनमेंट झोनमध्ये फक्त आपत्कालीन सुविधांना परवानगी आहे. संपूर्ण राज्यात संसर्ग पसरण्याचा धोका असल्याची भीतीही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. उच्च जोखीम श्रेणीतील लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 700 लोकांनाही सामाजिक अंतर राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









