लंडन (ब्रिटन)
2022-23 प्रीमियर लीग फुटबॉल हंगामासाठी लिव्हरपूल एफसी फुटबॉल क्लबने मोहम्मद सलाहच्या करारात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. आता लिव्हरपूलने 30 वर्षीय सलाहसमवेत दीर्घ मुदतीचा नवा करार केला आहे.
शुक्रवारी मोहम्मद सलाह आणि लिव्हरपूल यांच्यात हा लेखी करार झाला. मोहम्मद सलाहने यापूर्वी लिव्हरपूल संघाचे पाच वर्षे प्रतिनिधीत्व करताना 254 सामन्यांत 156 गोल नोंदविले आहेत. जून 2017 मध्ये मोहम्मद सलाहने एएस रोमा फुटबॉल क्लबमधून लिव्हरपूलमध्ये प्रवेश केला होता.









