मुंबई
मागच्या आठवडय़ामध्ये शेअरबाजारातील आघाडीवरच्या दहापैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल 2.34 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागच्या आठवडय़ामध्ये 2 लाख 34 हजार लाख कोटी रुपयांची वाढ बाजारभांडवलात दिसली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक वाढ नोंदली गेल्याचेही दिसून आले आहे. मागच्या आठवडय़ामध्ये 30 समभागांचा मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 1400 अंकांनी वधारला होता.









