वृत्तसंस्था/ मुंबई
सेन्सेक्समधील आघाडीवरच्या 10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 2 लाख कोटींची भर पडली आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल सर्वात अधिक वाढलेले पहायला मिळाले आहे.
4 कंपन्यांचे बाजार भांडवल मागील आठवडय़ात 2 लाख 31 हजार 320.37 कोटी रुपयांनी वाढले आहे. मागील आठवडय़ात बीएसई सेन्सेक्स 884.57 अंकांनी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रिजसह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस व आयसीआयसीआय बँक यांचे भांडवल वाढले आहे. पण एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी व भारती एअरटेल यांच्या बाजार भांडवलात मात्र घट झालेली पहायला मिळाली.