सर्वोच्च न्यायालयाकडून 5 जानेवारीपर्यंत दिलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मनी लाँड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आप नेते सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामिनाला 8 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सत्येंद्र कुमार जैन सध्या वैद्यकीय आधारावर अंतरिम जामिनावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 26 मे रोजी त्यांना सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला होता. नंतर त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जैन यांच्याविऊद्ध 24 ऑगस्ट 2017 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास सुरू केला होता. सत्येंद्र जैन यांनी 14 फेब्रुवारी 2015 ते 31 मे 2017 या कालावधीत अनेक लोकांच्या नावे जंगम मालमत्ता खरेदी केली होती. या व्यवहारातील तपशील ते समाधानकारकपणे देऊ शकले नव्हते. सत्येंद्र जैन यांच्यासह पुनम जैन, अजित प्रसाद जैन, सनील कुमार जैन, वैभव जैन आणि अंकुश जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









