नवी दिल्ली :
देशातील तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे त्यावरून दिसून आले आहे. भारताचा जीडीपी दर तिसऱ्या तिमाहीमध्ये 8.4 टक्के इतका राहिला आहे. याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावरसुद्धा दिसून आला. गेल्या 23 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 2.98 अब्ज डॉलरची वाढ नोंदली आहे. या आधीच्या म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 1.13 अब्ज डॉलर्स इतकी घट नोंदली गेली होती.









