नवी दिल्ली :
जगात मंदीची शक्यता असताना भारताच्याबाबतीत मात्र तज्ञ आणि गुंतवणूकदार यांचा विश्वास कायम असल्याचे दिसून आले आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 13 जूनला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा 2.294 अब्ज डॉलर्सने वाढून 698.95 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे. विदेशी चलन साठा सप्टेंबर 2024 मध्ये सर्वाधिक म्हणजे 704.885 अब्ज डॉलर्सवर पोहचला होता. जूनमध्ये पाहता 6 जुनला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा 5.17 अब्ज डॉलर्सने वाढला होता. यासोबत 13 जूनच्या आठवड्यात देशाचा सुवर्ण साठा 42.8 कोटी डॉलरने वाढून 86.316 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे.









