नवी दिल्ली :
गेल्या अनेक आठवड्यापासून भारतातील विदेशी चलन साठ्यामध्ये सातत्याने घट होण्याचा कल दिसून आला होता. मात्र 13 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारतीय विदेशी चलन साठ्यामध्ये सुदैवाने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यात 1.153 अब्ज डॉलरची भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. देशी चलन साठा 13 ऑक्टोबरअखेर 585.895 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. या आधीच्या आठवड्यामध्ये एकंदर चलन साठ्यामध्ये 2.166 अब्ज डॉलरची घट झाली होती. दुसरीकडे देशातील सुवर्ण साठा 1.268 अब्ज डॉलर्सने वाढला आहे.









