Sangli Rain Update : शिराळा तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चांदोली धरण ८४.४४ टक्क्यांपर्यंत भरले असून या धरणाची ३४.४० टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे. तर सध्या धरणामध्ये २८.७८ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने रविवारी चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने उचलून पाणी सांडव्यातून १३०० तर विद्युत निर्मितीतून १७०० असे एकूण ३००० क्युसेकने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे.
तर दुसऱ्या दिवशी चांदोली धरणातून सुरु असलेल्या २९५३ क्युसेक विसर्गमध्ये वाढ करून विद्युत गृहातून १६२८ क्युसेक व वक्राकार दरवाजातून ४००० क्युसेक असे एकूण ५६२८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तहसीलदार गणेश शिंदे व धरण व्यवस्थापनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








