कोल्हापूर :
शहर आणि परिसरात वर्चस्ववादातून हाणामारीचे प्रकार वाढत आहेत. त्यातून सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहे. गणेशोत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फाळकूटदादाही सक्रीय झाले आहेत, गांजा, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून…
कारण क्षुल्लक असो वा वर्चस्ववादाचे थेट नंग्या तलवारी, गज, काठ्या हातात घेऊन एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटना शहरासह उपनगरांमध्ये वाढल्या आहेत. कुणाची पर्वा अगर भीती न बाळगता दहशत निर्माण करणारी टोळकी उपनगरांमध्ये वाढत असून, यामुळे उपनगरांमध्ये नेहमीच अशांततेचे आणि अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा फाळकूटदादांना वेळीच लगाम घालण्याची गरज आहे.
शहर परिसरात किरकोळ हाणामाऱ्या या नित्याच्याच बनल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत रंकाळा टॉवर, वारे वसाहत, टिंबर मार्केटसह लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, सुभाषनगर, जवाहरनगर परिसरात हाणामाऱ्यांचे मोठे प्रकार घडले. यामध्ये शस्त्रांचाही वापर करण्यात आला. यामधील बहुतांशी प्रकार हे वर्चस्ववादातून घडल्याचे तपासात पुढे आले. अशा गुह्यांत अडकलेल्यांमध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे.
एकमेकांकडे बघणे, वाहन घासून मारणे, खुन्नस देणे, पूर्ववैमनस्यातून, आर्थिक व्यवहार घरात घुसून तोडफोड, छेडछाड अशा वेगवेगळ्या कारणांतून दररोज हाणाम्राया घडतात. शहरातील पोलिस ठाण्यात दाखल होण्राया गुह्यांवरून याचे वास्तव समोर येते. हाणाम्रायाच्या गुह्यातून बाहेर पडलेल्या फाळकूटदादांच्या अवतीभोवती टवाळखोरांचा आपोआप गराडा पडतो. त्याचे फलक भागात झळकू लागतात. त्याच्या निर्माण करू लागतात. यामधून जोरावर ते हळूहळू भागात वर्चस्व संघटित गुन्हेगारी फोफवण्याचे धोके वाढू लागतात.
यापूर्वी फाळकूटदादांवर पोलिसांचा चांगलाच वचक असायचा. पोलिस ठाण्यातील डीबीची (गुन्हे शोध पथक) हद्दीत गस्त असायची. त्यांना गल्लीबोळातील फाळकूटदादांची खडानखडा माहिती असायची. एलसीबीचाही (गुन्हे अन्वेषण शाखेचा) वचक असायचा. दरम्यान संघटित गुन्हेगारांवर पोलिस यंत्रणेने गेल्या दीड वर्षात हद्दपारीसह मोकाअंतर्गत कारवाया करून लगाम घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, फाळकूटदादांची नवी फळी डोके वर काढू लागली आहे. सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे वारे सुरू आहेत. त्यामुळे या अपप्रवृत्तीच्या वेळीच मुसक्या आवळा अशी मागणी होत आहे.
- हे अपेक्षित…
– गस्तीचे प्रमाण वाढवा
– गल्लीबोळातील टोळक्यांवर वॉच ठेवा
– ‘एलसीबी‘चीही शहरात गस्त हवी
– खब्रयांचे जाळे वाढवून संबंधितांवर कारवाई करा
– विनापरवाना फलकांवर तातडीने कारवाई करा
– रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्रायांना लगाम घाला
- संवेदनशील उपनगरे
– राजेंद्रनगर, दौलतनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, लक्षतीर्थ वसाहत, कळंबा पाचगांव, मोरेवाडी, सदरबाजार, ताराराणी पुतळा परिसर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी हे परिसर नेहमीच संवेदनशील आहेत. या ठिकाणी नेहमीच किरकोळ कारणावरुन वादावादीचे प्रसंग घडत असतात. या वादीचे पर्यावसन बहुतांशी वेळा हाणामारी तसेच खूनापर्यंतही झाल्याचे दिसत आहेत.
- पोस्टर बॉईजवर कारवाई आवश्यक
शहरात आणि परिसरात सध्या महापालिकेसह जिल्हापरिषद निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहे. यामुळे अनेक दादा, भाई उपनगरामध्ये पावसाळी छत्र्यांप्रमाणे तयार होवू लागले आहेत. या पोस्टर बॉईजवर धडक कारवाई करुन त्यांचा माज पोलिसांनी उतरविणे गरजेचे बनले आहे.
- धिंडमध्ये सातत्य हवे
जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांनी हद्दीमध्ये वादावादी करणाऱ्या गुंडावर धडक कारवाई करत त्यांना घटनास्थळावरुन फिरवले होते. ज्या भागात आपण रुबाब मारतो, दहशत माजवितो त्याच भागात बिनचप्पलाचे पोलीसी खाक्या दाखवत फिरवल्यामुळे या गावगुंडाची वळवळ काही दिवसांपूरती तरी शांत झाली होती. आता पुन्हा उपनगरात काही टोळक्यांनी आपली डोके वर काढले असून, त्यांच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिसांनी गणेशोत्सव आणि महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे आवश्यक आहे.








