वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
10 नव्या देशांचा निर्यातीसाठी पर्याय मिळाल्याने जागतिक आर्थिक मंदीच्या काळात भारताचा व्यवसाय वाढला आहे. अनेक विकसित देशांमध्ये अनिश्चितता आणि मंदीच्या भीतीमुळे सप्टेंबर 2023 पर्यंत अल्पकालीन घसरणीनंतर ऑक्टोबर 2023 मध्ये निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
नेदरलँड, सौदी अरेबिया, ब्राझील इंडोनेशिया यांसारख्या काही देशांमध्ये भारताची निर्यात आर्थिक वर्ष 19 ते आर्थिक वर्ष 2023 या 5 वर्षांमध्ये सातत्याने वाढली आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अहवालानुसार, हे देश निर्यातीसाठी भारतासाठी महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.
जागतिक आर्थिक मंदीच्या काळात या देशांनी भारतासोबतच्या व्यापारात उच्च सरासरी वाढ नोंदवली आहे.









