आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या (एआय) वाढत्या हस्तक्षेपामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये कर्मचारी नोकरीच्या अनिश्चिततेवरून चिंतेत आहेत. अमेरिकेत डॉक्टर अणि मनोचिकित्सकांकडे उपचारासाठी येणाऱ्या अशा लोकांची संख्या वाढली आहे, जे कुठे ना कुठे जॉब करतात आणि आपली नोकरी कधी जाईल याची कल्पना नसलेले हे लोक आहेत.

अशा स्थितीमुळे या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत आहे. अशा कर्मचाऱ्यांना चिंतेला डॉक्टर एआय एंक्झाइटी ठरवत आहेत. एआयविषयी चिंता व्यक्त करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कुठलीही नवी आणि अज्ञात गोष्ट चिंता निर्माण करणारी असते. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की याविषयी काही निश्चित सांगणे अत्यंत कठिण असल्याचे उद्गार न्यूयॉर्कमधील डॉक्टर क्लेयर गुस्तावसन यांनी काढले आहेत.
एआय स्क्रिप्ट रायटर्ससाठीही धोक्यचे
पुढील 10 वर्षांमध्ये नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. एंटरटेन्मेंट व्यावसायिक चित्रपट अन् टेलिव्हिजन शो निर्मितीच्या क्षेत्रात एआयच्या वापरावरुन चिंतेत आहेत. एआय आता अभिनेते आणि पटकथा लेखकांसाठीही धोकादायक आहे. मुख्य करून रचनात्मक क्षेत्रांशी निगडित लोकच एआय एंक्झाइटीने अधिक पीडित असल्याचे डॉ. गुस्तावसन यांनी सांगितले आहे.

लेखकांची गिग वर्करसारखी स्थिती
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने हॉलिवूडमध्ये नव्या आयडिया, स्टोरी लाइन, डायलॉग आणि स्क्रिप्ट रायटिंग अशाप्रकारची कामे होत आहेत. यामुळे लेखकांना कामे मिळेनाशी झाली आहेत. कलाकार दररोजच्या बरखास्तीमुळे वैतागून गेली आहेत. एआयमुळे कंपन्यांनी लेखकांना गिग वर्कर केल्याचे रायटर युनियनचे प्रमुख फ्रान ड्रेश्चर यांनी म्हटले आहे.
का वाढतेय एआय एंक्झाइटी
नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच जेनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटी एका कमांडमध्ये जटिल कामांना काही सेकंदांमध्ये पार पाडतो. लीगल असिस्टंट, प्रोग्रामर, अकौंटंट आणि फायनान्शियल अॅडव्हायजर यासारख्या जॉब्सना एआय पूर्ण कुशलतेने करू शकतो. मार्चमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार जेनेरिक एआय सुमारे 30 कोटी नोकऱ्या संपविणार असून त्यांना प्रभावित करत आहे.









