आमदार केदार नाईक : साळगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सत्कार
कांदोळी : भारत देश हा शेतीप्रधान असून आज युरोपियन देशांच्या बरोबरीने धान्य उत्पाद करत पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत अभियानातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेतून पर्यावरण पूरक शेती आणि कडधान्य उत्पादनासह विविध उपक्रम राबवित आहेत. त्यामुळे शेतीच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून शेती उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन साळगाव मतदारसंघाचे आमदार तथा गोवा औद्योगिक विकास मंडळाचे व्हाईस चेअरमन केदार नाईक यांनी केले. साळगाव मतदारसंघातील भाजप शेतकरी मोर्चातफ्xढ रविवार दि. 9 एप्रिल रोजी सांगोल्डा येथे साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या कृतिशील शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार नाईक बोलत होते. यावेळी आमदार केदार नाईक यांच्याहस्ते शेतीशी संबंधित उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा मानपत्र, सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यात रत्नेश नाईक तूयेकर, वसंत तेंडुलकर, प्रवीणा शिरोडकर, संगीता कांबळी व अक्षय पूर्खे यांचा समावेश होता. सत्कार सोहळ्यास जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, कळंगुटचे पंचायत सदस्य सुदेश मयेकर, सांगोल्डा सरपंच नीता कांदोळकर, उपसरपंच उल्हास मोरजकर, पंचायत सदस्य अविनाश नाईक, अनिल पऊळेकर, साळगाव भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश घाडी, सचिव दीपक राणे, गिरी माजी सरपंच फोंडू नाईक, उपस्थित होते. सुदेश मयेकर यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय कसा करावा या संदर्भातील बारकावे पटवून दिले. यूवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेतीत लक्ष घालावे. कडधान्य उत्पादन वाढवून इतरांसाठी रोजगार निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुऊवात झाली. रमेश घाडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनायक मयेकर यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश पूर्खे यांनी आभार मानले.









