वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरू असलेल्या 84 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीमध्ये हरियाणाची अनुपमा उपाध्ये आणि छत्तीसगडची आकर्षी काश्यप यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात आकर्षी काश्यपने आदिता रावचा 21-9, 21-19 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत अनुपमा उपाध्येने अस्मिता छल्हाचा 21-18, 11-21, 21-18 असा पराभव करत अंतिम फेरीत गाठली. या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राच्या हर्षल दाणीचे आव्हान संपुष्टात आले आहे. मध्यप्रदेशच्या पी. राजवतने हर्षल दाणीचा 21-14, 21-15 असा पराभव केला.









