वृत्तसंस्था/ मुंबइं
आर्थिक वर्ष 2022-23 साठीची प्राप्तीकर परतावा (रिटर्न) भरण्याची मुदत 31 जुलै रोजी संपली असून यंदा 6 काटी 77 लाख जणांनी आयटी रिटर्न फाईल केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही संख्या सर्वकालिक वाढीव असल्याचेही सांगितले जात आहे.
31 जुलै 2023 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी एकंदर 6.77 कोटी लोकांनी आयटीआर भरला असल्याचे समजते. मागच्या वर्षी 5.83 कोटी जणांनी आयटीआर भरला होता, या तुलनेत पाहता यंदा आयटीआर भरणाऱ्यांची संख्या 16 टक्के अधिक दिसून आली आहे. यातही 53.67 लाख लोकांनी पहिल्यांदा आयटीआर भरला आहे.









