भोपाळ :
मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भोपाळमधील सोम ग्रूपचे मालक जगदीश अरोरा यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सोम ग्र्रूपच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. भोपाळ समवेत अनेक ठिकाणी करचोरीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकात इंदोर आणि मुंबईतील अधिकारी सामील आहेत. भोपाळसोबत जबलपूर, इंदोर आणि रायसेन येथेही छापे टाकण्यात आले आहेत. याचबरोबर मुंबई, दिल्ली, कोलकाता, कटक आणि बेंगळूरमध्येही कारवाई करण्यात आल्याचे समजते.









