गोरखपूर :
उत्तरप्रदेशातील गोरखपूर आणि वाराणसीमध्ये मंगळवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. गोरखपूरमध्ये एकाचवेळी तीन ज्वेलरी शॉपवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले. तसेच संबंधित ज्वेलर्सच्या पाटणा येथील ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले आहेत. तर वाराणसी येथील ज्वेलर्सच्या घरी अन् शोरुममध्ये प्राप्तिकर विभागाच्या पथकाने झडती घेतली आहे. या ज्वेलर्सवर करचोरीचा आरोप असल्याचे समजते.









