वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूमध्ये शनिवारीही प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरूच होती. छापे टाकण्यासाठी आयटी पथक करूर आणि तिऊवन्नमलाई जिह्यात पोहोचले. तपास यंत्रणेने दिवंगत डीएमके नेते वासुगी मुऊगेसन यांची बहीण पद्मा आणि गांधीपुरम भागातील व्यापारी सुरेश यांचे कार्यालय आणि केव्हीपी नगर येथील त्यांच्या घराची झडती घेतली. यापूर्वी शुक्रवारी प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूचे मंत्री आणि महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते.









