केंद्रिय आयकर विभागाच्या ( Income Tax ) पथकाने आज बीबीसीच्या नवी दिल्लीतील आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यानंतर बीबीसीच्या (BBC) कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेउन त्यांची चौकशी केली गेली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जरी याला आयकर सर्वेक्षण असे म्हटले असले तरी अधिकाऱ्यांनी बीबीसीवर छापे टाकले आहे.
आयकर विभागाच्या टीमने मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील बीबीसी कर्यालयावर तसेच खारमधील कार्यालयावर लक्ष ठेऊन आहेत. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. सध्या सुरू असलेल्या झडतीमुळे बीबीसीच्या मुंबई कार्यालयात ईतर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कर आकारणी आणि किंमतींमधील हस्तांतरणामध्ये अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयकर विभाग बीबीसीच्या ऑफिसमध्ये छापे टाकले आहेत.
काही दिवसापुर्वी बीबीसीने 2002 च्या गुजरात दंगलीकडे लक्ष वेधणारा दोन भागांचा माहितीपट प्रदर्शित केला होता. या डॉक्युमेंटरीवर केंद्र सरकारने बंदी आणून ती सोशल मिडीया तसेच युट्युब वरून हटवण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी या माहीतीपटाचा निषेध करून हा माहीतीपट निव्वळ राजकिय प्रोपोगेंडा असल्याचे म्हटले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








