वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुधवारपासून खेळविल्या जाणाऱ्या इंग्लंड लायन्स विरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्यासाठी भारत अ संघामध्ये आक्रमक फलंदाज रिंकू सिंगचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात उभय संघातील चार दिवसांचा पहिला सामना अनिर्णीत राहिला होता.
भारत अ संघ – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साईसुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, व्ही. कवीरप्पा, उपेंद्र यादव, आकाशदीप, यश दयाल आणि रिंकू सिंग.









