वृत्तसंस्था / ब्लोमफाऊंटन (द. आफ्रिका)
ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात सध्या येथे वनडे मालिका सुरू आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी आपल्या संघात वेगवान गोलंदाज मिचेल निसेरचा समावेश केला आहे. 33 वर्षीय निसेरने आतापर्यंत दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2018 च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये निसेरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात निसेर तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज जॉन्सन यांचा समावेश राहील. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात द. आफ्रिकेचा तीन गड्यांनी पराभव केला होता.









