वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्सचा हॅरी ब्रुकच्या जागी बदली खिळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडच्या ब्रुकला खरेदी केले होते. पण ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर ब्रुकच्या आजीचे निधन झाल्याने तो मायदेशी रवाना झाला असून त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. 2021 साली विल्यम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 30 वर्षीय विल्यम्सने आतापर्यंत 2 कसोटी, 4 वनडे आणि 11 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते.









