इस्लामाबाद :
भारताशी स्पर्धा करत पाकिस्तानी नौदलाने दोन नव्या युद्धनौकांचा स्वत:च्या ताफ्यात समावेश केला आहे. यात कार्वेती पीएनएस बाबर आणि ऑफशोर गस्त युद्धनौका पीएनएस हुनैन सामील आहे. पीएनएस बाबर एक बहुउद्देशीय युद्धनौका असून ती तुर्कियेने निर्माण केली आहे. तर पीएनएस हुनैनची निर्मिती रोमानियाने केली आहे. पाकिस्तानकरता अजून 2 युद्धनौकांची निर्मिती इस्तंबुलच्या शिपयार्डमध्ये केली जाणार आहे. या युद्धनौकांची क्षमता अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.









