तरुणभारत ऑनलाइन टीम
हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे.लोह आणि प्रोटीन पासून ते बनलेलं असतं. आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची योग्य पातळी असणे गरजेचे आहे.जेंव्हा हिमोग्लोबिनची पातळी खाली येते तेंव्हा अशक्तपणा,डोकेदुखी, थकवा ,भूक न लागणे, वारंवार झोप येणे, चक्कर येणे अशा शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.पण आपल्या आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवू शकतात.जाणून घेऊया हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नेमके कोणते घटक आहेत.
१. बीट
बीट हा लोह वाढवणारा घटक आहे. नुसतं बीट खाणं जसं फायदेशीर असतं तसंच लोह वाढण्यासाठी बीटाचा ज्यूस पिणं लाभदायक ठरतं.बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
२. टोमॅटो
टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.
३. डाळिंब
डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .
४. खजूर
खजूर हे लोहासोबतच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.
५. गूळ
गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.रोज एक तुकडा गूळ खाणं ही चांगली सवय आहे. लोह वाढण्यासाठी गूळ शेंगदाणे हे एकत्र खाणं फायदेशीर असतं.
६. सुकामेवा
निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा असे म्हटले जाते. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळू शकते. शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.