बेळगाव प्रतिनिधी– उप्पार समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे. या समाजाचा अनुसुचित जाती-जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहेत. यापूर्वीच्या विविध मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणीहि या समाजाकडे लक्ष दिले नाहि. तेंव्हा तातडीने उप्पार समाजाला अनुसुचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा या समाजाच्यावतीने सरकारला देण्यात आला आहे. अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे.
कर्नाटक मध्ये जवळपास 50 लाखांहून अधिक जनसंख्या असलेला हा समाज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. 2006 पासून केवळ आश्वासने दिली गेली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी तसेच बी. एस. येडियुराप्पा यांनीहि या समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करतो असे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारकडे शिफारस करु, असेहि सांगण्यात आले होते. मात्र आजतागायत या समाजाला अनुसुचित जाती-जमातीमध्ये समावेश करण्यात आला नाहि.
काँग्रेसनेहि केवळ आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता येणार्या निवडणुकीपूर्वी आम्हाला ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे. किल्ला तलावापासून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कित्तूर चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी उप्पार समाजाचे राज्याध्यक्ष अॅड. विष्णू लातूर, जिल्हा अध्यक्ष मंजुनाथ राजप्प ण्णावर, अॅड. एन. आर. लातूर, चंद्रशेखर अलगोडी, रामकृष्ण बबली, एम. बी.उप्पार , रेखा लखुंडी, शांती तिगडी यांच्यासह उप्पार समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन