विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय विकास महामंडळाला 200 कोटी रुपयांचे अनुदान द्या, सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा, सोमवंशीय सहस्त्रार्जुन जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यासाठी मान्यता द्या, आदी मागण्यांसाठी राज्य सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजातर्फे गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. समाजातील दृष्ट व वाईट प्रवृत्ती दूर करण्याचे काम राज्य सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजातर्फे केले जाते. मात्र समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. त्याबरोबर उद्योगधंद्यांसाठी बँकांकडूनही कर्ज मिळत नाही, परिणामी फायनान्स व सोसायटींकडून चढ्या व्याजाने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्याघ् मागासलेल्या या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी होत आहे. त्याबरोबर समाजाच्या विकासासाठी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय विकास मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाला 200 कोटी रुपये अनुदान देण्यात यावे.









