बेळगाव प्रतिनिधी– कुरबर समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे. या समाजाचा अनुसुचित जाती-जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहेत. यापूर्वीच्या विविध मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणीहि या समाजाकडे लक्ष दिले नाहि. तेंव्हा तातडीने कुरबर समाजाला अनुसुचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा या समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी नितेश पाटिल यांना निवेदन देऊन सरकारला देण्यात आला आहे.
त्यामुळे आता येणार्या निवडणुकीपूर्वी आम्हाला ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी माज़ी विधान परिषद सदस्य विवेक पाटिल, डॉ. राजेंद्र सन्नकी , माजी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे , बसवराज बसळीगुंदी ,शंकरराव हेडगे , अशोक मेटगुड़ , विनायक बनहट्टी , एस.एफ.पूजारी , डी.डी.डोकोजी, बाबूराव वाघमोडे यांच्यासह समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









