Cholesterol: तुमच्या रक्तात कमी घनतेचे लिपोप्रोटीन जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण अनेकदा अनहेल्दी डाइट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि बाहेरचे तळलेले अन्न, साखरयुक्त पदार्थ आणि कमी फायबरयुक्त पदार्थ असतात. तसेच मद्याचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे देखील याचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा. यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल आणि हृदयविकाराचा धोका वाढणार नाही. कोणती फळे खावीत जाणून घेऊय़ा.
व्हिटॅमिन सी फळ
हृदयरोग आणि रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी व्हिटामीन सी असणाऱ्या फळांना प्राधान्य द्या. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात.म्हणून ही फळे खावीत.
एवोकॅडो
उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) आणि कमी घनता लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल या दोन्ही स्तरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एवोकॅडो अत्यंत फायदेशीर आहे.एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयासाठी फायदेशीर असतात.
जांभूळ
जांभळामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे तुमचे हृदय निरोगी ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जांभळाच्या सीझमध्ये जांभूळ खाण्यावर भर द्या.
केळी
केळीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे तसेच सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज सारख्या शर्करा भरपूर प्रमाणात असतात. पोटॅशियम आणि फायबरचा हा एक चांगला स्रोत आहे जो कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
फाइबर फूड
फायबर असणारी फळे हृदय-निरोगी आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. या फळांमध्ये विद्राव्य फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्याला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत पेक्टिन म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते असे मानले जाते. फायबर समृध्द फळांपैकी आपण नियमितपणे सफरचंद आणि नाशपाती खाऊ शकतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









