Boost Immunity: दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाच्या झळा जास्तच जाणवू लागल्या आहेत. यामुळे श्वसनाचे अनेक आजारही झपाट्याने पसरत आहेत. यासाठी आरोग्यदायी आहार पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला पाहिजे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. उन्हाळ्यात उष्माघात,डिहायड्रेशन, अतिसारासारखे विविध आजार झपाट्याने होत असतात. म्हणूनच पुरेसे पाणी, हलका आहार,कमी उष्मांक असलेल्या अन्नाचा समावेश करावा. या उन्हाळ्यात आजारांना फाईट देण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या आहाराचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा
उन्हाळ्यात तुमच्या आहारात चॉकलेट, मांस, पालक आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या भरपूर झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याऐवजी नैसर्गिक पद्धतींचा वापर करावा. उन्हाळा हा वर्षातील सर्वात महत्वाचा हंगाम आहे ज्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.
सूपचा वापर करा
हाडांमध्ये बळकटी येण्यासाठी सूपचा आहारात वापर करा. सूपमध्ये जीवनसत्त्वे,खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.तुम्ही मटण किंवा चिकणचे सूप पिऊ शकता.सुपमध्ये असणारे लसूण, दालचिनी , अद्रक यामुळे शरीराला ताकद मिळते.
व्हिटॅमिन सी
तुमच्या दैनंदिन आहारात किवी, संत्री,पपई आणि लिंबू यांसारख्या पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.फळे आणि भाज्या ज्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे एकत्रितपणे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असतात. व्हिटॅमिन सी हा रोग प्रतिकारशक्तीचा आधार मानला जातो.
आहारात लोहचा वापर करा
लोहाची कमतरता असलेला आहार तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतो. ज्यामुळे अॅनिमियासारख्या परिस्थिती देखील होऊ शकते. म्हणूनच लोहयुक्त आहार खाणे गरजेचे आहे. मांस,बिया,नट, सुकामेवा लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात असे पदार्थ खावे जे पचन प्रक्रियेत मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात.ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासाठी हलका आहार हा मूलभूत पाया आहे. तुमच्या व्हिटॅमिनची पातळी तुमच्या तज्ञांकडून वेळोवेळी तपासणे देखील महत्त्वाचे आहे.
Previous Articleजनतेचा कौल भाजपच्या बाजूने नसल्यानेच मनपा निवडणूका लांबणीवर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.