मातोंड – तळवडे रस्त्यावरील घटना
न्हावेली / वार्ताहर
मातोंड – तळवडे मार्गांवर रिक्षा समोर अचानक गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना शुक्रवार सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अधिक माहिती अशी की रिक्षा चालक मातोंड वरून तळवडेच्या दिशेने जात होते. अचानक गवारेडा रिक्षे समोर आल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात 4.30 च्या सुमारास घडला. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे.









