मळगाव रेल्वेस्टेशन येथील घटना
न्हावेली / वार्ताहर
मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाच्या आवारात पार्क करून ठेवलेली रेल्वे कर्मचाऱ्याची मोटरसायकल चोरून पलायन करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला तब्बल न्हावेली पर्यंत थरारक पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. निरवडे येथील मनोहर पारकर या युवकाने त्याला ताब्यात घेत पुन्हा रेल्वे स्थानक परिसरात आणले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पारकर यांनी दिली आहे









