दोडामार्ग – वार्ताहर
दारुच्या नशेत पायवाटेने चालत जात असताना देवाच्या तळीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जाॅर्ज सायर फर्नांडिस (५२ वर्षे) रा. आडाळी (ख्रिश्चनवाडी) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी १२:१५ वा.च्या सुमारास आडाळी येथे घडली. मेलविन फ्रान्सिस फर्नांडिस (४३ वर्षे) रा. आडाळी (ख्रिश्चनवाडी) यांनी घटनेची खबर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
Previous ArticleKarnataka News : नोकरीवरून काढल्याने शासकिय महिला अधिकाऱ्याची हत्या; बेंगळूर मधील धक्कादायक प्रकार
Next Article मातोंड, पेंडूर ग्रामपंचायतीवर भाजपचा धुरळा









