पाळी, सुर्ला, वेळगे परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्याचे स्वप्न पूर्ण : चांगल्या प्रकल्पांना खो घालण्याची मानसिकता सोडा : मुख्यमंत्री
सांखळी : सांखळी मतदारसंघात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारण्यासाठी विशेष लक्ष दिले असून दहा कोटी खर्चून जिल्हा खनिज निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्प पाळी, सुर्ला, वेळगे येथील लोकांची तहान भावणारा आपला विशेष प्रकल्प आहे. सरकार राज्यातील चाळीस टक्के जनतेला मोफत पाणी पुरवत असून सरकारच्या तिजोरीवर भार न देता विविध माध्यमातून नवे प्रकल्प साकारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी जनतेने चांगल्या प्रकल्पांना खो घालण्याची मानसिकता सोडून विकासाच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी आंबेशी येथे जलप्रकल्प लोकार्पण कार्यक्रमात बोलताना केले. मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, जिल्हाधिकारी मामू हागे, गौरांगी परब , सरपंच शिवदास मुळगावकर, वेळगे सरपंच सामंता कामत,सुर्ला सरपंच विश्र्रांती सुर्लकर, श्री तीवरेकर, सुभाष फोंडेकर,संतोष नाईक, लवू आमडकर, प्रशिला गावडे, आदी उपस्थित होते.
जिल्हा खनिज निधीतून दहा कोटी ऊपये खर्च
नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवणे सरकार विशेष ध्यान देत आहे. सरकार प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजना आखत आहे. पाळी, सुर्ला, वेळगे या भागात अनेक वर्षे पाणी प्रŽ सोडवण्यासाठी आपले प्रयत्न होते. आज हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान असून या भागात आता मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पस्ट केले. सांखळी मतदारसंघात सर्वच बाबतीत आधुनिक विकास साधलेला आहे प्रत्येक क्षेत्रात विकास झाला असून अनेक वर्षांचे रस्ते, पाणी समस्या निकालात काढल्या आहे. जनतेचे पूर्ण सहकार्य लाभले तर् विकास प्रक्रिया गतिमान होते असेही डॉ सावंत म्हणाले
अभियंता, जमीनदार यांचे विशेष अभिनंदन
जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जिल्हा खनिज निधीतुन साकारणारा हा नावीन्य प्रकल्प असुन त्यामुळे वेळगे, सुर्ला, पाळी, या खनिजपट्ट्यातील लोकांच्या पाण्याची समस्या दूर होणार असून त्यासाठी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी तत्परतेने पाठपूरावा केल्याचे सांगितले. प्रत्येक गावात पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत पावसाचे पाणी साठवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या जल शक्ती कार्यक्रमातून प्रत्येक पंचायतींनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मामू हागे यांनी यावेळी केले. सरपंच शिवदास मुळगावकर, सामंता कामत, विश्र्रांती सुर्लकर यांनी या योजनेमुले या भागात नियमित पुरवठा होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.









