बेळगाव : शहराच्या वीजपुरवठ्यात सुधारणा व्हाव्यात यासाठी अशोकनगर ते कणबर्गी येथील विद्युत केंद्रापर्यंत 400 चौरस मीटर भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याच्या कामाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ व हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. महांतेशनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी या भागात कोणत्याही विद्युत समस्या निर्माण झाल्यास पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच कणबर्गी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यास नेहरूनगर येथून थेट वीजपुरवठा करणेही शक्य होणार आहे. याचा फायदा ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहतीला होणार असल्याचे आमदार सेठ यांनी सांगितले. यावेळी हेस्कॉमचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे व इतर उपस्थित होते.
Previous Articleपावसामुळे शेतकरी अडचणीत
Next Article शहापूर-खडेबाजार येथील ‘त्या’ गळतीची दुरुस्ती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









