जोहान्सबर्ग :
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे देशातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येच्या 2 टक्केपेक्षा कमी लोकसंख्या हिंदू धर्माची असली तरी देशातील भारतीय समुदायामध्ये हा सर्वात जास्त पाळला जाणारा धर्म आहे. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.









