कोल्हापूर :
शिवाजी पेठेची मदर संस्था म्हणून गेली 93 वर्षे कार्यरत असलेल्या शिवाजी तऊण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाला शनिवारी दिमाखात प्रारंभ करण्यात आला. खास शिवजयंती उत्सवासाठी उभा माऊती चौकात उभारलेल्या भव्य 60 फुट ऊंद व 40 फुट उंचीच्या राजमहलच्या प्रतिकृतीचे फटाकांच्या आतषबाजीत शिवाजी तऊण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम इंगवले, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांच्या हस्ते उद्घाटन केले. तसेच प्रतिकृतीमध्ये विराजमान केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजनही करण्यात आले.
प्रतिकृतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसुरे, वीर शिवा काशीद, येसाजी कंक, बर्हिजी नाईक यांची वेशभूषा केली होती. यावेळी करणसिंह पाटील यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती.
येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी तऊण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवजयंती सोहळ्यात अग्रभागी असलेल्या विविध मंडळांनी उभा माऊती चौक ते निवृत्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेले फलक उभारले आहेत. त्यामुळे सारे वातावरणच शिवमय झाले आहे. या वातावरणातच शनिवारी दुपारी अश्वाऊढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात आली. दसरा चौकातून सुऊ केलेल्या या शोभायात्रेत मंडळाचे पाचशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी होते. यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सर्वांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन शोभायात्रा मार्ग शिवमय केला. ही शोभायात्रा आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारूती चौक आदी मार्गावऊन उभा माऊती चौकात पोहोचली. येथे आतषबाजी कऊन पुतळ्याचे स्वागत केले. यानंतर पुतळ्याला भव्य राजमहलाच्या प्रतिकृतीमध्ये पुतळ्याला विराजमान केले. सायंकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजमहलाच्या प्रतिकृती उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात झाले.
यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक सत्यजित कदम, संजय कुराडे, सुनील काटकर, राजेंद्र चव्हाण, मनोज जाधव, राहूल जरग, विक्रम सदाशिव जरग, प्रताप देसाई, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी तऊण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, मोहनराव साळोखे, रवींद्र साळोखे, उदय भोसले, राहुल इंगवले, विशाल बोंगाळे, अशोक देसाई, सुशील भांदिगरे आदी उपस्थित होते.








