176 हून अधिक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी दर्शविला सहभाग
बेळगाव : द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमन बेळगाव या संघटनेच्या विद्यार्थी शाखेचा नुकताच प्रारंभ झाला. 176 हून अधिक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग दर्शवला आहे. बेळगाव परिसरातील केएलई, अंगडी, जैन यासह इतर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फौंड्रीविषयी माहिती देण्यासोबतच इंडियन फौंड्रीमन संस्था कशी चालविली जाते, याबाबतची माहिती देण्यात आली. इंडियन फौंड्रीमन संस्थेचा इतिहास तसेच त्यांच्याकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला चेअरमन आदित्य पारीख, सेक्रेटरी विक्रम सैनुचे, खजिनदार रवी संगोळ्ळी, कौन्सिलचे सदस्य भाऊराव पाटील यासह इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









