सांगरूळ / वार्ताहर
लवकर ध्येय निश्चित करून ध्येयाच्या दिशेने प्रामाणिक वाटचाल केल्यास यश लवकर मिळते. तरूणांनो कौशल्य प्राप्त करून उद्योगाकडे वळा , नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बना असे आवाहन वॉल वर्क इंडिया लिमिटेड कंपनीचे संस्थापक प्रमुख उद्योजक अमर शेळके यांनी केले. सांगरूळ (ता करवीर )येथील श्री जोतिबा देवालयाच्या निसर्गरम्य वातावरणात उमेद फौंडेशनने तरुणाईला आयुषाचा खरा अर्थ समजावून घेण्यासाठी ५ ते ७ मे या तीन दिवसीय राज्यस्तरीय श्रम संस्कार शिबीर आयोजित केले आहे त्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या युवा उमेद शिबीरासाठी महाराष्ट्रातील सुमारे ९० युवक सहभागी झाले आहे. सुरुवातीस स्वागत प्रास्ताविक प्रकाश गाताडे यांनी केले . विनायक पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .यानंतर, वडाचे झाड लावून पाणी घालून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन केले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रांमध्ये इंग्लिश कम्युनिमेशन फॉर करिअर या विषयावर प्रा गौतम माने यांनी खूप छान मार्गदर्शन केले.शेवटच्या सत्रात दिव्यांगांची स्पर्धा परीक्षा यशोगाथा यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या दिपक पोवार, सारीका पोवार ,विनायक पोवार,रघुनाथ खोत यांचा मुलाखतीमधून जीवनप्रवास जाणून घेतला ,मुलाखत सचिन कुंभार यांनी घेतली.सूत्रसंचालन श्रीकांत टिपूगडे , आभार नविणचंद्र सनगर यावेळी उमेद चे प्रकाश म्हेत्तर , दशरथ आयरे , विक्रम म्हाळुंगेकर , इंद्रजित खाडे , सचिन बगाडे , किशोर भोसले, अभय पाटील ,महेश खाडे , अक्षय तावडे , प्रेरणा पाटील, ऋतुजा पाटील, सचिन कुंभार , विजय केरबा, विश्वजीत बच्चे , नितीन पाटील, राजेंद्र पाटील , प्रदीप नाळे ,सागर पेंडुरकर, दिगंबर पाटील, भिमराव चाबूक , राजाराम पात्रे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
Previous Articleबारसूचा मुद्दा राजकीय नाही
Next Article कुलगुरूपदासाठी 27 उमेदवार पात्र









