ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नागपुरात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तब्बल 700 किमी लांबीचा हा महामार्ग आहे. या महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं. अखेर आज याचा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा सुरू झाला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी या महामार्गावरुन प्रवासाचा अनुभव देखील घेतला. त्याआधी महामार्गाच्या कोनशिलेचं अनावर मोदींच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री नितीन गडकरी आणि डॉ. भारती पवार यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
https://www.facebook.com/watch/?v=819613072459132
मोदींच्या हस्ते आज नागपूरात जवळपास 75 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांच्या उदघाटन आणि भूमीपूजनाचा कार्यक्रम होत आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. मेट्रोच्या फेज दोनचं भूमीपूजन केल्यानंतर मोदींनी नागपूर मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.