प्रतिनिधी /मडगाव
आरएके सिरॅमिक्स या जगातील आघाडीच्या सिरॅमिक्स ब्रँडने भगवती एंटरप्रायझेसच्या सहकार्याने गोव्यातील पहिला शोरूम सां तुझे दि आरियल येथे किंग्स स्कूलनजीक उघडलेला असून त्याचे उद्घाटन शनिवारी झाले. हे केंद्र भारतीय ग्राहकांसाठी स्पर्धात्मक किमतीत आलिशान सिरेमिक बाथवेअर उत्पादनांची जागतिक श्रेणी आणण्याच्या आरएके सिरॅमिक्सच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
याप्रसंगी, भगवती एंटरप्रायझेसचे मालक खिमजी पटेल आणि त्यांचे पुत्र गौतम पटेल आणि कमलेश पटेल, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नरेंद्र सावईकर (गोवा सरकारचे एनआरआय व्यवहार आयुक्त) तसेच आरएके सिरॅमिक्सचे संजय शर्मा (अध्यक्ष विक्री आणि मार्केटिंग), वरि÷ सरव्यवस्थापक विजय गणेश, साजिद छिपा आणि देवेंद्र आंबोळकर यांचीही उपस्थिती होती.
2,372 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेल्या या शोरूमची आखणी समकालीन आणि भुरळ पडणारी असून कंपनीने येत्या काही महिन्यांत या शोरूममध्ये उत्पादनांच्या अधिक आंतरराष्ट्रीय श्रेणी सादर करण्याची योजना आखली आहे. आरएके सिरॅमिक्स ही या विभागातील सर्वांत वेगाने वाढणारी कंपनी आहे. सध्या, कंपनीचे भारतात 10 फ्लॅगशिप शोरूम आहेत, ज्यात पुणे आणि मुंबई अशी महाराष्ट्रातील दोन केंदे आहेत.
संजय शर्मा (अध्यक्ष विक्री आणि मार्केटिंग, आरएके सिरॅमिक्स इंडिया) यांनी गोव्यातील शोरुमच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले की “गोवा आता एक विकसित ’बी-टू-बी’ आणि ’बी-टू-सी’ बाजारपेठ बनली आहे, ज्यामध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे. आमचे प्रीमियम डीलर भगवती एंटरप्रायझेसच्या सहकार्याने गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोरूमचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. आमची टाइल्स, सॅनिटरीवेअर आणि नळ अशी सर्व उत्पादने या शोरूममध्ये प्रदर्शित केली जातील. आम्ही गोवा आणि जवळपासच्या भागांतील वाढत्या उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ग्राहकांना सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत. या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि मानकांची सर्वोत्तम उत्पादने हवी आहेत”.
विस्तार योजनांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, “आम्ही भारतातील आमच्या सर्व सहयोगी स्टोअर्सवर ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणखी अनेक अशी आस्थापने उघडण्यासाठी आक्रमक योजना आखत आहोत”. आरएके सिरॅमिक्स ही भारतातील एकमेव अशी बहुराष्ट्रीय सिरॅमिक कंपनी आहे ज्यांची आंतरराष्ट्रीय उत्पादन श्रेणी देशी बाजाराच्या भावात उपलब्ध आहे. यूएई, भारत आणि बांगलादेशमधील कार्यालयांसह 150 हून अधिक देशांमध्ये त्यांची उपस्थिती आहे. कंपनीची जागतिक स्तरावर वार्षिक उलाढाल एक अब्ज डॉलर्सच्या घरात आहे आणि ती बारा हजाराहून अधिक लोकांना रोजगार देते.









