वार्ताहर /येळ्ळूर
अनगोळ येथील प्लेजंट इंग्लीश मीडियम हायस्कूल व सार्वजनिक शिक्षण खाते यांच्यावतीने अनगोळ क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी यशोधर जैन होते. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्रीशैल कांबळे, सीआरपी श्रीनिवास सोनटक्की, रयत मोर्चा उपाध्यक्ष अजित पाटील, राज्य उपाध्यक्ष गुरुगौडा पाटील, बीआरसी एस. बी. पाटील, रिजवान नावगेकर, प्रभारी मुख्याध्यापक एच. बी. पाटील यांच्यासह मराठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 23 प्राथमिक शाळा व 6 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री दाडीयागोळ यांनी केले. जयश्री मजगावकर यांनी आभार मानले.









