प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या संवाद, कथा आणि किस्से यांचे संकलन असलेल्या ’परीक्षा वॉरियर्स अपिअर विथ अ स्माइल’ या पुस्तकाचे लोकार्पण केले.
विद्यार्थी आणि पालकांसांठी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाखाली या पुस्तकाचे संकलन केले असून नैतिकता वाढविण्यासाठी आणि परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. मुख्यमंत्र्यानी विद्यार्थी आणि पालकांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी 21 जानेवारी 2023 रोजी सांखळी येथील रवींद्र भवनात आणि 23 जानेवारी 2023 रोजी दक्षिण गोव्यातील मडगाव येथील रवींद्र भवनात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातील.









