मंगलदास नाईक यांच्या हस्ते गणेशपूजन ; ओंकार मेलोडिज ऑर्केस्ट्राने रसिक स्वरमुग्ध
पणजी ; पणजी शिगमोत्सव समितीतर्?s येथील आझाद मैदानावर रंगपंचमी निमित्त मंगळवारी झालेल्या गुलालोत्सवाचा आनंद आबाल वृद्ध,महिला, पर्यटक यांनी मनमुरादपणे लुटला. वाद्यवृंदाच्या तालावर एकमेकांवर रंग उधळून बेधुंदपणे नृत्यही केले.रंग बरसे भिगी चुनरवा.., शांताबाई.., शोर मच गया शोर..,झिंगाट अशा गीतांनी बहार आणली. सायंकाळपासून शिमगोत्सवातील विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी 9 वा पणजीकरांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मीला नारळ ठेवून व ग्राहाणे घालून पणजी शिगमोत्सवाचे मानद अध्यक्ष श्रीनिवास धेंपे,कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी आशीर्वाद घेऊन गुलालोत्सव शोभा यात्रेला प्रारंभ केला .यावेळी विशेष अतिथी आमदार आंतासीओ मोंसेरात, महापौर रोहित मोंसेरात,उपमहापौर संजीव नाईक तसेंच समितीचे सचिव शांताराम नाईक,कोषाध्यक्ष संदीप अनंत नाईक उपस्थित होते. गुलालोत्सवाला उत्पल पर्रीकर यांनीही उपस्थिती लावली .
कार्यक्रमांचा शुभारंभ
संध्याकाळी समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांच्या हस्ते गणपतीची विधिवत पुजा करून व उभारलेल्या भव्य आणि कलात्मक रंगमंचावर नारळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ केला. त्यांनतर सत्यवान नाईक प्रस्तुत ओंकार मेलोडिज हा वाद्यवृंद कार्यक्रम रंगला. यावेळी निर्माता सत्यवान नाईक यांचा सन्मान करण्यात आला .वाद्यवृंदात मुंबई येथील गायक हरमान व शामल कुलकर्णी, गोव्यातील गायक आरीफ सय्यद, काविश सुर्लकर,निलम खुटवळकर यांचा समावेश होता. समीर म्हाळशी (की बोर्ड), डेरिक (ऑक्टोपॅड),अतुल गुरव (हॅन्डसोनिक ) यांची वाद्यवृंद साथ होती. रफिक शेख यांनी निवेदन केले.प्राचार्य शशिकांत सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले.









