प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील गारमेंट क्षेत्रातील एक लोकप्रिय ब्रँड म्हणजे भरणे क्रिएशन्स असून या उद्योग समूहाने नुकतेच पणजी येथील विद्युत खात्याच्या इमारतीच्या बाजूला बीइंग हय़ुमन या शोरूमचे उद्घाटन पणजीचे आमदार तथा मजूरमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या हस्ते नुकतेच झाले. या शोरूम मध्ये बीइंग हय़ुमन या ब्रँडचे विविध डिझाइन्स, रंग संगती अत्याधुनिक पद्धतीचे फॅशन्स असे वस्त्रप्रावरणे उपलब्ध आहेत. यावेळी समृद्ध भरणे, संजय भरणे, सचिन भरणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.









