पंतप्रधान मोदींची व्हर्च्युअली उपस्थिती : केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाला वेग
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकीकृत टर्मिनल भवनाचे उद्घाटन पेले आहे. या नव्या टर्मिनल भवनासाठी 710 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या नव्या सुविधेमुळे केंद्रशासित प्रदेशातील संपर्कव्यवस्थेला वेग मिळणार आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकीकृत टर्मिनल इमारतीमुळे प्रवास अन् व्यापार करण्यास सुलभता निर्माण होण्यासह कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. यापूर्वीच्या टर्मिनलची क्षमता प्रतिदिन 4 हजार पर्यटकांना हाताळण्याची होती, परंतु नव्या टर्मिनलमुळे या विमानतळाची क्षमता प्रतिदिन 11 हजार पर्यटकांना सेवा पुरविण्याइतकी झाली आहे. तसेच पोर्ट ब्लेअरसाठी नवी विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
अंदमान-निकोबर बेटसमुहातील विमानतळ भारताला समर्पित करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली-चेन्नई-विशाखापट्टणमसाठी कनेक्टिव्हिटी निर्माण होईल आणि भविष्यात याहून अधिक कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचे उद्गार नागरी विमानो•ाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले आहेत. याचबरोबर चार वॉटर ड्रोन स्थापित केले जाणार असून यामुळे अंदमान-निकोबार बेटसमुहाचा आर्थिक विकास होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेक सुविधांचा अंतर्भाव
नवे टर्मिनल भवन सुमारे 40,800 चौरस मीटरमध्ये फैलावलेले आहे. नवे टर्मिनल भर दरवर्षी 50 लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम होईल. तसेच विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चुन दोन बोइंग 767-400 आणि दोन एअरब-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त एक एप्रन देखील निर्माण करण्यात आला आहे. यामुळे विमानतळावर एकाचवेळी 10 विमानांना पार्क करता येणार आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनल भवनाला शंखाचा आकार देण्यात आला आहे.









